वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनांत खावयास मिळतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या ओळखता मात्र आल्या पाहिजे. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. स्थानिक परंपरागत ज्ञानाप्रमाणे विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवर जखमांवर केला जातो. उदा कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. अगदी मक्यासारखाचा पण बहारदार दिसणा-या या मक्याचा कंद विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरतात..
आपल्या भागातील विविध रानभाज्यांविषयीचे संकलन या लेखामध्ये आहे. लिंक वर क्लिक करुन भाजीची, ओळख, पाककृती, औषधी उपयोग अशी माहिती मिळवा.
यावेळी वाटीमध्ये रस्सा नव्हता. घेवड्याच्या आकाराचे काहीतरी, वाटीभरुन, सुके, मसाल्यामध्ये मस्त वाफलुन घेतलेले. मी आधी चमच्याने दाबुन पाहिले तर तो जिन्नस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे तपासुन पाहिले.
जाणीवपुर्वक , मी खाणार असलेला पदार्थ काय आहे हे न विचारताच मी एक चमचा भरुन घेतला, व अलगद घास घेतला
हे अगदी मोजकेच फोटो आहेत. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा या भागात आत्तापर्यंत १९ वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन केले गेले आहे. आणि या १९ मधील ११ प्रजाती सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट अशा आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्वाच्या या घटकाकडे खरेतर तर आपण कुतुहलाने कधीच पाहत नाही. याला पाहुन बरेच जण किळस करतात. खरेतर बेडुक सर्प यांच्या इतके स्वच्छ प्राणी जगात दुसरे कोणतेही नसतात. यांना त्यांच्या अंगावर धुळीचा एक ही कण आवडत नाही. आपल्याकडील बेडकांच्या विश्वात संशोधनासाठी खुप वाव आहे. बेडकांविषयी जनजागरण देखील खुप महत्वाचे आहे. यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे आहे.