बेडुक व निसर्गाची अन्नसाखळी

Share this if you like it..

८५ दशलक्ष वर्षापुर्वी पासुन आपल्या पश्चिम घाटामध्ये राहणारा एक सर्वात जुना उभयचर जीव कोणता आहे हे तुम्हाला माहित आहे काय?

नाव – Micrixalus शाखा – Micrixalinae, उपशाखा -Micrixalidae

Dancing frog is common sight at Nisargshala Campsite

Dancing frog is common sight in Western Ghats

हा आहे मावळ पट्ट्यातील सर्वात जुना जाणता जीव. म्हणजे या पृथ्वीवर मानवाचा जन्म होण्याच्याही कित्येक लाखो वर्षांपासुन हा जीव इथे नांदतो आहे.

हा आहे एक बेडुक.

आपल्या भागात (पुणे शहराच्या पश्चिम मावळ पट्ट्यात) बेडकांचे अस्तित्व जाणवायला सुरुवात होते ती पावसाच्या आगमनानंतर. कित्येक जातीचे बेडुक जमीनीखाली खोलवर पावसाची वाट पाहत हिवाळा आणि उन्हाळा घालवतात. व पावसाच्या आगमनानंतर ते पृष्टभागावर येतात. आपण मागील एका लेखामध्ये मृगाच्या किड्या विषयी माहिती घेतली होती. त्या किड्या प्रमाणेचे हे बेडुक देखील वर्षातील बराच काळ सुप्तावस्थेमध्ये जातात.

भारतात विशेषतः पश्चिमघाटामध्ये (घाटमाथा) एकुण २०० च्या आसपास जाती आणि किमान दुप्पट उपजाती आहेत. या २०० प्रजातींपैकी १५९ प्रजाती फक्त आणि फक्त पश्चिम घाटामध्येच सापडतात. म्हणजे या १५९ जातीचे बेडुक आख्ख्या जगात फक्त आपल्याकडेच आहेत. इंग्रजीमध्ये अशा प्रजातीस एंडेमिक म्हणजे प्रदेशनिष्ट असे म्हणतात.

डराव डराव असा बेडकांचा आवाज आपण जोवर वयाने लहान होतो तोवरच आपल्याला ऐकु यायचे. आता आपल्या कानावर मोबाईलच्या रिंगटोन, व्हॉट्सॲपच्या मेसेज नोटीफिकेशन येते. आपण लहान असताना या बेडकांविषयी आपण निर्विकार होतो. क्वचित त्यांची भीती वाटायची. आमच्या गावी मला आठवते घराशेजारी शेणाचा उकिरडा असायचा. उकीरडा म्हणजे शेणखताने भरलेला खड्डा व पावसाळा सुरु होण्यापुर्वीच तो खड्डा रिकामा व्हायचा. पाऊस सुरु झाला की त्या खड्ड्यामध्ये पाणी साठायचे व नकळत त्या खड्ड्यांच्या दिशेकडुन बेडकांचा डराव डराव असा आवाज रात्र रात्र भर ऐकु यायचा. अशी अवस्था कमी प्रमाणात अद्द्याप मावळ पट्ट्यात आहे.

या बेडकांचा अभ्यास आपण जीवशास्त्रात केला की नाही हे मला आता आठवत नाही. आपल्या एकुणच पर्यावरण व अन्नसाखळीवर बेडकांचा काही परिणाम होतो की नाही हे देखील आजपर्यंत नीटसे माहित नव्हते. मानवी वस्त्यांच्या आसपास बेडुक डास, छोटे किटक खातात. तसेच जंगलांमध्ये देखील किट सदृश्य सुक्ष्म जीव बेडकांचे खाद्य आहे. हे जे सुक्ष्म जीव आहेत ते मुख्यतः शेवाळ, गवत, पाला पाचोळा आदी खाणारे असतात. गंमत बघा. सुर्यापासुन येणा-या ऊर्जेचे रुपांतर वनस्पती पासुन प्राण्यांमध्ये करण्याचे मध्यस्थाचे महत्वाचे काम हे बेडुक करतात. ते कसे?

तर बेडुक हा उभयचर प्राणी साप, पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. या सापांना खाणारे प्राणी आणि पक्षीही आहेत. जर बेडुक संपले तर विचार करा या अन्न साखळीची काय अवस्था होईल.

बेडुक फक्त साप किंवा प्राणी पक्षांनाच खायला आवडतो असे नाही. इंडियन बुल फ्रॉग नावाची एक बेडकाची जात आहे. ही जात आकाराने भली मोठी होऊ शकते. म्हणजे एखादा पुर्ण वाढ झालेला बेडुक किमान अर्धा किलो पर्यंत वाढु शकतो. जीवन संस्थेचे जगदीश गोडबोलेंच्या सोबत, मी ११ वी ला असताना पवन मावळात १५ दिवस राहण्याचा योग आला होता. या १५ दिवसांत जंगलातील एक्स्ट्रीक सर्व्हायव्हल स्किल्सचे धडे अगदी सहजपणे त्यांनी दिले. हा इंडियन बुल फ्रॉग, जो भाताच्या खाचरांमध्ये सापडतो, आकाराने मोठा असतो, त्याला पकडावा कसा, अलगद कापावा कसा, त्याची चामडे वेगळे कसे करावे याची माहिती त्यांनी दिलेली मला चांगलीच आठवते आहे. नंतरच्या काळात असेही समजले की याच प्रजातीच्या बेडकाची अन्य देशांमध्ये अक्षरशः शेती देखील केली जाते. उच्च प्रथिन युक्त ही बेडुक चवीला अगदी लुसलुशीत चिकन ला देखील लाजवेल.

सर्वात आधी उल्लेख केलेला ८५ दशलक्ष वर्ष इतका जुना बेडुक जो सह्याद्री मध्ये आढळतो, त्यास इंडियन डान्सिंग फ्रॉग असे ही म्हंटले जाते.

आपल्या भागात आढळणा-या काही बेडकांचे फोटो खाली आहेत.

HoplobatrachusTigerinus

वाघासारखे ठिपके/पट्टे अंगावर असतात म्हणुन याचे नाव टायगरीना असे पडले

ही प्रजाती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे कारण आहे त्यांच्या अधिवासात मानवाकडुन झालेला हस्तक्षेप

१८७० साली एका ब्रिटीश प्राणीशास्त्रज्ञाने या जातीचा शोध निलगिरी जंगलात लावला म्हणुन याला सर्रास निलगिरी बेडुक असे म्हटले जाते. पण ताम्हिणी परीसरात देखील हा बेडुक आढळतो.

१८७० साली एका ब्रिटीश प्राणीशास्त्रज्ञाने या जातीचा शोध निलगिरी जंगलात लावला म्हणुन याला सर्रास निलगिरी बेडुक असे म्हटले जाते. पण ताम्हिणी परीसरात देखील हा बेडुक आढळतो.

 

हाच तो इंडियन बुल फ्रॉग..याविषयी काही रोचक माहिती वर लिहिली आहेहाच तो इंडियन बुल फ्रॉग..याविषयी काही रोचक माहिती वर लिहिली आहे. पाण्याच्या जागा, भात खाचरे आदी ठिकाणी अगदी सर्वत्र आढळणारी ही जात अगदी पुण्याच्या कोथरुड,पर्वती भागात देखील पाहिली गेली आहे २००२ सालापर्यंत.

 

रंग बदलणा-या सरड्याविषयी आपण वाचले होते..पण हा बेडुक देखील रंग बदलु शकतो. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा आदी भागात हा वर्षारण्यामध्ये आढळतो

रंग बदलणा-या सरड्याविषयी आपण वाचले होते..पण हा बेडुक देखील रंग बदलु शकतो. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा आदी भागात हा वर्षारण्यामध्ये आढळतो…

चपखल पणे उडी मारणारा छोटासा असा हा बेडुक पाणथळ जागांमध्ये असतो.

चपखल पणे उडी मारणारा छोटासा असा हा बेडुक पाणथळ जागांमध्ये असतो.

झाडे, भिंती, दरवाजे यांना सहजगत्या चिकटु शकतो असा हा सुरुवातीस कालीकत मध्ये आढलेला बेडुक आपल्या भागात देखील आहे.

झाडे, भिंती, दरवाजे यांना सहजगत्या चिकटु शकतो असा हा सुरुवातीस कालीकत मध्ये आढलेला बेडुक आपल्या भागात देखील आहे.

 

हे अगदी मोजकेच फोटो आहेत. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा या भागात आत्तापर्यंत १९ वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन केले गेले आहे. आणि या १९ मधील ११ प्रजाती सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट अशा आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्वाच्या या घटकाकडे खरेतर तर आपण कुतुहलाने कधीच पाहत नाही. याला पाहुन बरेच जण किळस करतात.  खरेतर बेडुक सर्प यांच्या इतके स्वच्छ प्राणी जगात दुसरे कोणतेही नसतात. यांना त्यांच्या अंगावर धुळीचा एक ही कण आवडत नाही. आपल्याकडील बेडकांच्या विश्वात संशोधनासाठी खुप वाव आहे. बेडकांविषयी जनजागरण देखील खुप महत्वाचे आहे. यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे आहे. 

तुम्ही किमान एक गोष्ट करु शकता ती म्हणजे जर तुम्ही कधी मुळशी, ताम्हिणी,  वेल्हे भागात आलात तर तुमच्या गाडीच्या चाकाखाली एक ही बेडुक मरणार नाही याची काळजी घ्या.

 

 

 

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *