माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.
“वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती” म्हणत एकांताचा वास निसर्गाच्या सानिध्यात घेताना “आपुलाची वाद आपणासी” अशी स्वःतच्या अंतर्मनास साद घालणारे तुकोब्बा राय असो किंवा सह्याद्रीच्या कड्याकपा-यांतुन वाहणा-या जलप्रपातांच्या घळयांतुन साधना करणारे समर्थ रामदास असोत, किंबहुना सगळ्याच संत महंतांस या सह्याद्रीने, या निसर्गाने आकर्षित केलेले आपणास दिसते आहे.
Tukaram, a saint poet of Maharashtra, sang songs of harmony with Nature.
गुणसंपन्न सह्याद्री
सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला, त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील.
सदोदीत उन वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत सह्याद्री एखाद्या तपस्व्याप्रमाणे अढळपणे उभा आहे. तो अविचल आहे. तो निर्विकार आहे. कसल्याही बाह्य व्यवधानांचा परीणाम त्याच्या तपश्चर्येवर होत नाही. म्हणुनच की काय सह्याद्रीची विरक्ती त्याच्या विविध बौध्द लेण्यांतुन कोरली गेली आहे.
Hemant Vavale…At one of his explorations of Sahyadri at Gopya ghat of Velhe.
असंख्य प्राणीमात्रांस अभय देणा-या सह्याद्रीची एकात्मता त्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जैवविविधतेमध्ये आहे. सह्याद्रीचा रुद्रावतार त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांमध्ये आहे.
सह्याद्रीचे मातृत्व त्याच्या कड्या कपा-यांतुन उगम घेणा-या शेकडो नद्यांमध्ये आहे, ज्या पुढे जाऊन फक्त जलवाहीन्या न राहता जीवनवाहीन्या बनतात. किमान हजारेक नद्यांचा उगम सह्य रांगामध्ये होतो. काही पुर्व वाहीन्या तर काही पश्चिम वाहीन्या आहेत. शहरांना पिण्यासाठी पाणी, पाणी साठे, जलविद्युत प्रकल्प, शेतीसाठी धरणे, बंधारे, कालवे हे सर्व सह्याद्रीच्याच जीवावर आहे.
Indian roller @ Nisargshala
सह्याद्रीचे पितृत्व त्याच्या अंगाखांद्यावर हजारो लाखो वर्षे आनंदाने खेळणा-या बागडणा-या असंख्य प्राणीमात्रांच्या पालनपोषणामध्ये आहे. मागे एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्रीमध्ये आढळणा-या एका बेडकाची जात साडे आठशे लाख वर्षापुर्वीची मानली जाते. व ही जात फक्त सह्याद्रीमध्येच आहे. आणि हा पुरातन काळ म्हणजे या पृथ्वीतलावर मानव नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होण्याआधीचा काळ आहे. संशोधकांचा कयास जर प्रमाण मानला तर, आपणास माहीत असलेल्या या ज्ञात जीवास सह्याद्रीने कित्येक लाखो वर्षे सांभाळले आहे हे स्पष्ट दिसते.
प्राचीन भारतीय संस्कृतीचा आधार सह्याद्री
ह्यासोबतच सह्याद्रीच्या कुशीत भारतीय संस्कृतीची छाप अगदी डोंगर द-यात असणा-या वाड्या-पाड्यावर देखील पहावयास मिळते. आपल्याकडे एक म्हण आहे, की भाषा दर पाच मैलांवर बदलते. भाषा बदल म्हणजे सांस्कृतिक वेगवेगळेपण हे नक्कीच. असे हे वेगळेपण आपणास बारा मावळांत पहावयास मिळते. ही बारा ही मावळे सह्याद्रीच्या कुशीतच आहेत. हे वेगळेपण विशिष्ट प्रसंगी पहावयास मिळते. एक उदाहरण सांगतो इथे. आमचे कडे एखाद्या व्यक्तिच्या और्ध्वदैहीक आचारांमध्ये एका दगडास( खडा ) विशेष स्थान आहे. याला जीवखडा असे म्हणतात. आता जीवखडा नावाची संकल्पना बाराच्या बारा मावळांत म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री मध्ये वसलेल्या डोंगरद-यात राहणा-या लोकांत आहे. पण त्यात थोडे थोडे भेद आहेत. जसे काही ठिकाणी हा खडा मरणोपरांत दहा दिवस घराच्या बाहेर टांगुन ठेवतात तर काही ठिकाणी तेरा दिवस. काही ठिकाणी हा खडा घराच्या आढ्याला आतुन टांगतात तर काही ठिकाणी हा खडा भिंतीला असेलेल्या खुंटीला टांगतात. तर सांगायचा मुद्दा असा की वेगळेपण असले तरी जीवखडा संकल्पना मात्र सगळीकडे दिसते. कुणी शिकवले असेल बरे ह्या मावळ भागातल्या म्हणजेच डोंगरद-यात वाड्यावस्त्यांमध्ये लोकांस हे कर्मकांड? हे कर्मकांड योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण एकसुत्रता सर्वत्र दिसुन येते. नुसतीच सह्याद्रीमध्येच आहे असे नाही तर संपुर्ण भारतात ही सांस्कृतिक एकसुत्रता दिसते आपणास.
विकृती, प्रकृती आणि संस्कृती
विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात. झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”.
वटपोर्णिमा is a highly logical and ecological festival celebrated across India
यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पांढरा पायजमा, सदरा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात राहते. मी त्यांना विचारले की इतक्या उशीरा कसे काय निघालात पुण्याकडे तर ते म्हणाले की ते ज्ञाती ने न्हावी आहेत व गावात जोंधळे घ्यायला आले होते. दर शनिवारी व रविवारी ते गावी येतात व गावातील लोकांची दाढी डोकी (हजामत) करतात. त्यांच्याकडे स्वतची शेती नाही. पण ह्या बलुतेदारीतुन त्यांना त्या वर्षी २८ अठ्ठावीस पोती भात, तेवढीच ज्वारी मिळाले. व त्यांच्या जन्मापासुन त्यांना व त्यापुर्वी त्यांच्या वाड वडीलांना देखील ही बलुतेदारी होती. पुर्वी त्यातीलच काही विकुण मसाले,तेल, कपडे आदी विकत घेत. म्हणजे गावातील गावकी मध्ये प्रत्येक घटकास सामावुन घेण्याची क्षमता होती व त्या प्रत्येक घटकाच्या पालनपोषणाची जबाबदारी समाज घेत होता. असेच पुर्वी इतर बलुतेदारांचे ही असायचे. व संस्कृतीच्या ह्या खाणा खुणा सह्याद्रीच्या कानाकोप-यात आज ही पहावयास मिळतील.
सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावा
अंदाजे सहा सात वर्षापुर्वी मी हिरडस मावळात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे मला आश्चर्य चकीत करणारा असा सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावाच मिळाला. तिथे एक गोपाळ भेटला. गोपाळ हे त्याचे नाव नव्हते तर त्याच्या कामावरुन त्याला व त्याच्या सारख्या अनेकांना पडलेले नाव होते. हा गोपाळ गायीं पाळणाराच होता. व त्याही पुढे जाऊन गोपाळकृष्णासारखा एक पावा म्हणजे बासरी देखील घेऊन डोंगरावर गायींना चारत होता. वीसएक गायी, काही बैल, वासरे, गो-हे असा पन्नास एक जनावरांचा कळप त्याच्या मागेपुढे चरत फिरत होता. त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती . अंगावर साधी मळकी कपडे होती. व आणखी एक विशेष घोंगडी की जिला जागोजाग घुंगरांनी सजवले होते अशी घेउन स्वतला पाउस व थंडीपासुन वाचवुन गायींना चारत होता. त्याच्या पाव्याला देखील घुंगरं लावली होती. त्याचे नाव गाव विचारले नाही. पण त्याच्याकडुन हे समजले की मावळात अशा प्रकारचे गोपाळ गावोगाव असत. यावरुन सह्याद्रीच्या कुशीतील एकेकाळच्या श्रीमंत संस्कृतीचे पुसटशे दर्शनच आम्हाला घडले. निसर्गात गायींना चारण्यासाठी घेऊन जाणे व बासरी वाजवणे, संगीत साधना करणे, निसर्ग व स्वतच्या गायी यांच्याशी एकात्मभाव स्थापित करणे हा तर हेतु नसेल ह्या गोपाळांचा?
हा गोपाळ पावा वाजवताना त्याचे चित्रीकरण मी करु शकलो. तुम्ही सुध्दा बघा व ऐका.
दुःखाची गोष्ट अशी की आपण आपले हे वैभव गमावुन बसलो आहोत. येत्या काही दशकांमध्ये, मला जशा खाणाखुणा दिसल्या त्यादेखील दिसणार नाहीत.
असो. सह्याद्रीविषयी आणखी ही बरेच लिहिता , बोलता येऊ शकेल. विस्तारभयास्तव इथे विराम घेतो. तुम्हाला सह्याद्री मध्ये भटकंती करताना असे अनुभव आले असतील तर अवश्य इथे कमेंट करा तसेच ही पोस्ट शेयर देखील करा.
एकदा सपकाळ सरांसोबत मी अजीवलीच्या देवराई परीसरात होतो. रात्री एका कौलारु घराच्या, शेणाने सारवलेल्या अंगणात पथा-या टाकुन आम्ही पाठ टेकवुन आकाशाकडे पाहात होतो. सरांनी आकाशाकडे बोट करुन स्वाती दाखवली, चित्रा दाखवली आणि मग म्हणाले ती बघ तिकडे, दुर, क्षितिजाच्या अगदी जवळ 'सारीका'...मी शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण मला काही सारिका दिसली नाही तिथे.....
रोहिणी ओळखण्याची आणखी एक सोपी पध्दत म्हणजे मृगनक्षत्र तारे समुहातील व्याध, व्याधाने मारलेल्या बाणातील पहिला तारा अश्या दोन ता-यांना जोडणारी रेष सरळ पश्चिमेकडे वाढवली तर ती पुढे ज्या ता-याला मिळेल तो म्हणजे रोहिणी नक्षत्रातील सर्वात तेजस्वी तारा.
चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र
मुलांचे बालपण हिरावुन घेऊ पाहणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग खरतर खुपच कमी आहे निखळ आनंदासाठी. डोळ्यांचे विकार, गेम खेळण्याचा सवय, सोशल मीडीयावर सतत लक्ष अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना हळुह्ळु मानसिक व शारिरीक दृष्ट्या जड बनवितात. मोबाइल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानातील खेळ खेळण्यात अधिक आनंद आहे याची प्रचीती अशा शिबिरांमधुन होत असते.
या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की....
आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..
तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.
हा तानाजी कडा खरंच कां हो इतका जीवघेणा, अवघड आहे ?काय झाले असेल नेमके अपघाताचे कारण ?" कारण,आणि खरंच असल्या प्राणघातकी छंदास, खेळ कसे समजावे आम्ही?"
आणखीही बरंच काही विचारत होते तात्या.
पुंडलीक सरांच्या त्या कातर झालेल्या स्नेह्यास, म्हणजे तात्यांना मी काहीबाही उत्तरे देत गेलो. पण,यापेक्षा देखील वरचढ मूर्खपणा मी काही दिवसापूर्वीच त्याच कड्यावर केला होता, हे सांगण्याचे धाडस मात्र मला झाले नाही.
सुर्यसिद्धांत या खगोलीय ग्रंथामध्ये ब्रह्महृद्याबाबतील खालील श्लोक येतो.
हुतभुग्ब्रह्महृद्यौ वृषे द्वाविंंशभागगौ ॥
अष्टाभिः त्रिंशता चैव विक्षिप्तावुत्तरेण तौ ।
सुर्य सिध्दांत हे पुस्तक १२००० वर्षांपुर्वी लिहिलेले आहे.
ब्रह्महृद्य या ता-याची चित्तरकथा वाचण्यासाठी लिंक करा..
आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.
क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे?