0

आकाशातील चित्तरकथा  – सर्प व सर्पधर

प्राचीन भारतीय साहित्य किंवा आख्यायिका, दंतकथांमध्ये या सर्प व सर्पधराची कथा न येण्याचे कारण असे असेल की भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी कल्पिलेल्या २७ (वेदकाळात २८) नक्षत्रांच्या पट्ट्यात हा तारकापुंज येत नाही. अत्यंत प्रगत असणा-या भारतीय खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी, सुर्य व इतर ग्रहांच्या अभ्यासाने कालनिश्चय करुन कालगणनेची सुत्र मांडली. कदाचित हजारो वर्षांपुर्वी बनवलेली ही सुत्रे आज ही तितकीच उपयोगाची आहेत. त्यामुळे निव्वळ कथा कल्पना विस्तार की ज्याचा खगोलशास्त्राशी काही संबंध नाही अशा गोष्टी भारतीय खगोल शास्त्रामध्ये खुप कमी प्रमाणात आढळतात.
Continue reading
0

आकाशातील चित्तरकथा – आकाशातील विंचु

आपल्या भागातुन, सध्या सायंकाळी ७ च्या सुमारास दक्षिण दिशेला, क्षितिजीच्या थोडेसे वर, अंधारत असताना या नक्षत्रातील तारे चमकु लागतात. व पुढ्चे २ ते अडीच तासच आपण हे नक्षत्र आकाशामध्ये पाहु शकतो. नंतर हे मावळते. खालील आकृतीमधील इंग्रजीमध्ये Scorpius असे लिहिलेले जे आडवे झालेले नक्षत्र दिसते आहे तेच वृश्चिक नक्षत्र होय.
Continue reading
महाराष्ट्रातील रानभाज्या
0

मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनांत खावयास मिळतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या ओळखता मात्र आल्या पाहिजे. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. स्थानिक परंपरागत ज्ञानाप्रमाणे विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवर जखमांवर केला जातो. उदा कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. अगदी मक्यासारखाचा पण बहारदार दिसणा-या या मक्याचा कंद विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरतात.. आपल्या भागातील विविध रानभाज्यांविषयीचे संकलन या लेखामध्ये आहे. लिंक वर क्लिक करुन भाजीची, ओळख, पाककृती, औषधी उपयोग अशी माहिती मिळवा.
Continue reading
0

पावसाळ्यातील आणखी एक रानमेवा

यावेळी वाटीमध्ये रस्सा नव्हता. घेवड्याच्या आकाराचे काहीतरी, वाटीभरुन, सुके, मसाल्यामध्ये मस्त वाफलुन घेतलेले. मी आधी चमच्याने दाबुन पाहिले तर तो जिन्नस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे की नाही हे तपासुन पाहिले. जाणीवपुर्वक , मी खाणार असलेला पदार्थ काय आहे हे न विचारताच मी एक चमचा भरुन घेतला, व अलगद घास घेतला
Continue reading
0

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईट...
Continue reading