Hiking

संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

संधीकाळी या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.

पावसाळ्यातील आणखी एक रानमेवा

मागच्या पंधरा दिवसात कुमकरांच्या घरी दररोजच जावे लागले होते. एकदा त्यांनी अळंबी खाऊ घातली होती. दुस-या वेळी देखील त्यांनी संकोचुनच विचारले की सर तुमच्यासाठी आणखी एक वशाट ठेवलय राखुन रानातलं. खाणार का? रानातल काहीही असो शाकाहारी भाज्या असोत वा मांसाहारी…

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेण्याचे भाग्य लाभले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी…

वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार

वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार

तरुण, उत्साही पर्यटक प्रथमेश चे वय अंदाजे २०-२१ वर्षे असेल. नुकतीच पदवी घेऊन कोर्टात वकीलीची प्रॅक्टीस करण्यास त्याने सुरुवात केली. मित्र मैत्रिणींचा जुना ग्रुप अनेक महिन्यांनी एकत्र आला. आणि त्यांनी कॅम्पिंग ला जायचे ठरवले. गुगल इंटरनेट वर सरअह करुन, वेगवेगळ्या…