Sacred Grove

Camping, Team Outing, Trekking

संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा – रायलिंग पठार एक अनुभव

वाळलेल्या सुकलेल्या गवताच्या गालिचांच्या मध्येच जशी कारवी हिरव्या रंगाची छटा तयार करीत होती तशीच पुंजक्या पुंजक्यांनी वाढलेली झाडे देखील मधुनच नजरेला गर्द हिरव्या रंगाचा नजराणा देत होती. कधी ऊन्हातुन तरी कधी झाडांच्या सावलीतुन आम्ही पठारावर येऊन पोहोचलो होतो.आता वाट पाहायची होती ती सुर्यनारायणाच्या गच्छतीच्या वेळचा आसमंत अनुभवण्याची. सुर्याचे खाली खाली सरकणे डोळ्यांना जाणवत होते. उन्हाचा चटका कधीच संपला होता.

महाराष्ट्रातील रानभाज्या
Environment, Nature

मावळातील रानभाज्या – ओळख, गुणधर्म व पाककृती

वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वेगवेगळ्या भाज्या आपणास रानावनांत खावयास मिळतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवींच्या या भाज्या ओळखता मात्र आल्या पाहिजे. यातील अनेक वनस्पती औषधी आहेत. स्थानिक परंपरागत ज्ञानाप्रमाणे विविध वनस्पतींचा उपयोग विविध विकारांवर जखमांवर केला जातो. उदा कोळ्याचा मका नावाचा एक कंद पावसाळ्यात फुलतो. अगदी मक्यासारखाचा पण बहारदार दिसणा-या या मक्याचा कंद विंचवाचे विष उतरवण्यासाठी वापरतात..
आपल्या भागातील विविध रानभाज्यांविषयीचे संकलन या लेखामध्ये आहे. लिंक वर क्लिक करुन भाजीची, ओळख, पाककृती, औषधी उपयोग अशी माहिती मिळवा.

Monsoon Drive, Nature, Outing places near Pune, Team Outing, Torna

पावसाळ्यातील दोन वशाट रानमेवे

मागच्या काही दिवसात मी सलग १५ दिवस कॅम्पसाईट व वेल्ह्याच्या मावळ पट्ट्यात कामानिमित्त मुक्कामी होतो. कॅम्पसाईटवर नवीन शौचालये, एक बहुउद्देशीय

Camping, Monsoon Drive, Nature

बेडुक व निसर्गाची अन्नसाखळी

हे अगदी मोजकेच फोटो आहेत. मुळशी ताम्हिणी, वेल्हे मावळ पट्टा या भागात आत्तापर्यंत १९ वेगवेगळ्या प्रजातींविषयी संशोधन केले गेले आहे. आणि या १९ मधील ११ प्रजाती सह्याद्रीतील प्रदेशनिष्ट अशा आहेत. निसर्गाच्या अन्नसाखळीतील अत्यंत महत्वाच्या या घटकाकडे खरेतर तर आपण कुतुहलाने कधीच पाहत नाही. याला पाहुन बरेच जण किळस करतात.  खरेतर बेडुक सर्प यांच्या इतके स्वच्छ प्राणी जगात दुसरे कोणतेही नसतात. यांना त्यांच्या अंगावर धुळीचा एक ही कण आवडत नाही. आपल्याकडील बेडकांच्या विश्वात संशोधनासाठी खुप वाव आहे. बेडकांविषयी जनजागरण देखील खुप महत्वाचे आहे. यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे आहे.

Camping, Nature, Trekking

गोसावी किडा, प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील

Write a review

Scroll to Top