Western Ghats

Historical stories

भग्न कैलासगड व माझी कारवीशैय्या

चांगल्या दोन तीन डझनभर ताज्या काठ्या आणि त्याला अजुनही न सुकलेली भरदार गच्च हिरवी पाने होती. मी त्वरीत उठलो, सर्व कारवी जमा केली आणि एकावर एक रचली व पाचेक मिनिटांनी माझा कारवीचा बेड तयार झाला. अगदी तॄणशैय्या जरी नसली तरी हलता झुलता हवेशीर वेडावाकडा असा माझा तो बेड सज्ज होता. माझा हा सर्व पराक्रम सुरु असताना सोबतची मंडळी मात्र मला वेड्यात काढण्यात कसलीही कसर सोडत नव्हते. मी मात्र

Camping, Kids

निसर्गशिबिर का गरजेचे आहे?

मुलांचे बालपण हिरावुन घेऊ पाहणा-या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग खरतर खुपच कमी आहे निखळ आनंदासाठी.   डोळ्यांचे विकार, गेम खेळण्याचा सवय, सोशल मीडीयावर सतत लक्ष अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुलांना हळुह्ळु मानसिक व शारिरीक दृष्ट्या जड बनवितात. मोबाइल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानातील खेळ खेळण्यात अधिक आनंद आहे याची प्रचीती अशा शिबिरांमधुन होत असते. 

Environment

भारतातील बांबु – काल, आज आणि…

या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की….

Camping, Kids, Tourism

निसर्गशाळा – मागे वळुन पाहताना

आणि निसर्गशाळेची ही दुसरी सहल ठरली. त्यावेळी निसर्गशाळेत माळरानाशिवाय अन्य काहीच नव्हते. पावसाळ्यातच केवळ सुंदर, विलोभनीय दिसणारी निसर्गशाळा उन्हाळ्यात हकास व्हायची. झाडे नव्हती, हिरवे छत्र अजिबात नव्हते. एकही साधे पत्र्याचे छप्पर देखील नव्हते. टॉईलेट नव्हते..

Bird Watching, Environment, Nature

शाळेसोबतच निसर्गात रमणारा निसर्गशिक्षक मिलिंद गिरधारी

तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.

Environment

प्रगती म्हणजेच निसर्ग-हास : हे समीकरण बदलले पाहिजे.

आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.

Camping, Team Outing, Trekking

पायाखालची वाट तुडवायची ?

क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे?

Historical stories, Rajgad, Torna

जेम्स डगलस यांच्या नजरेतुन सह्याद्री, मावळे व शिवाजी महाराज

की कुणी या कातळकड्यांच्या उसळणा-या लाटा तासुन बनविल्या असतील बरे? असे कोण आहे की ज्याने या कातळ सदृश्य पुराण-पुरुषांचा माथा कोरुन त्यांचे शिरपेच बनविले आहे? असे कोण आहे की ज्याने या खोल, रुंदच रुंद, अंतहीन कपारी, कंदरे, गुहा खोदल्या असतील? ह्म्म्.. दगडांच्या लाटा निर्माण करणा-या महान वादळाचा कर्ता मी आहे, होय मीच आहे!

Scroll to Top