Kids

Camping, Kids, Nature, Team Outing, Trekking

Indian Roller Bird (नीलकंठ) @ Nisargshala

याला नीळकंठ का म्हणतात या विषयी थोडं अनुमान आपण लावु शकतोच, की याचा कंठभाग थोडासा पुसटश्या निळ्या छ्टेचा आहे. पंख , पोट कंठापेक्षा खुपच जास्त निळे असतात, तरीही यास नीळपंख असे न म्हणता नीळकंठ म्हटले गेले कारण रामायणामध्ये याचा आलेला उल्लेख होय. रावण हत्या म्हणजे ब्राह्मणहत्या व ब्राह्मणहत्येच्या पातकापासुन मुक्ती मिळवण्यासाठी केलेल्या व्रताला स्वयं भोलेनाथ नीलकंठ पक्ष्याचे रुप घेऊन उपस्थित होते अशी आख्यायिका उत्तर भारत तसेच बंगाल मध्ये सर्वश्रुत आहे. भगवान शंकराशी असलेली हीच नाळ लक्षात घेऊन भारतभर या पक्ष्याला नीळकंठ याच नावाने ओळखले जाते. याला ब्लु जय(जे) असेही म्हणतात.

Write a review

Scroll to Top