तारांगणाखाली एक मोहक संध्याकाळ
८ नोव्हेंबर २०२५ — ही तारीख फक्त पंचांगातली नाही, तर निसर्गाशी पुन्हा जोडण्याची एक अनोखी संधी आहे. त्या रात्री आकाशात कॅसिओपिया, अँड्रोमेडा, पर्सियस, पेगासस यांसारखी मोहक नक्षत्रे चमकणार आहेत. वृषभ उगवेल, तर सिग्नस आणि लिरा अस्ताला जाताना निरोप देतील.
आकाशाच्या त्या असीम पटलावर चंद्र असेल — वेनिंग गिबस अवस्थेत, सुमारे ८५ टक्के प्रकाशित. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो क्षितिजावर उगवेल, मीन राशीतून आपल्या प्रकाशाने निसर्गाला रूपेरी झळाळी देत. दुर्बिणीतून पाहताना त्याचे खड्डे, पर्वतरांगा आणि छटा जणू आपल्याशी संवाद साधतील.
निसर्गशाळा येथे येऊन या अनुभवाचा भाग व्हा. तार्यांच पांघरुण, चंद्राच्या मंद प्रकाशाचे ऊब अनुभवत, आपण आणि निसर्ग — एवढंच उरतं.
चला, या दिवशी थोडं थांबू या. वर पाहू या. आणि पुन्हा एकदा स्वतःला सांगुयात — आपण देखील याच विश्वाचा भाग आहोत.