पावसाळी रानफुलांच्या निमित्ताने…
मित्र-मैत्रिणींनो सह्याद्रीवरील या फुलांचा बहर काय केवळ सौंदर्याचा आस्वाद मानवाने घ्यावा म्हणुनच नसतो बर का! सह्याद्रीची आपली स्वतःची एक परिस्थीतीकी म्हणजे इकोसिस्टीम आहे. या योजने मध्ये निसर्गातील प्रत्येक घटक आपापले कार्य अगदी न चुकता जसे करणे गरजेचे आहे तसे करीत असतो. कधी काळी मनुष्य देखील याच योजनेचा एक भाग होता.

