संगीत रजनी ती देखील निसर्गाच्या कुशीत कशी असेल बरे?
संगीत ऐकण्याच्या साधनेसाठी , आनंद रोम-रोमामध्ये भारुन घेण्यासाठी, भाव-विभोर होण्यासाठी, नाद-ब्रह्माच्या प्राप्तीसाठी कोलाहलापासुन दूर, प्रदुषणापासुन दूर, नितांत सुंदर डोंगर-द-यांमध्ये, एखाद्या नदीच्या काठावर, फोन-मोबाईल-सोशल मीडीया आदी सर्वांपासुन दुर, उबदार थंडीच्या दुलईखाली आपण निसर्गशाळेत संगीत रजनी चे आयोजन करीत असतो. तुम्हाला देखील आवडेल ना या साधनेचा व समाधीचा अनुभव घ्यायला?
चला तर मग भेटुयात निसर्गशाळेत, अश्या अभुतपुर्व संगीत रजनी साठी.
पुढे काय?
मागील वर्षी म्हणजे सन २०२२ मध्ये आपण निसर्गशाळा येथे संगीत रजनी कार्यक्रमांमध्ये Instrumental प्रकारचे कार्यक्रम घेतले. त्यातील पहिला कार्यक्रम झाला तो म्हणजे प्रसिध्द सितार वादक श्री शाकीर खान यांचा जानेवारीमध्ये. आलेल्या सर्वच पाहुण्यांना हा कार्यक्रम खुपच आवडला. शाकीर खान यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील अनेक रचना वाजवुन रसिकांना मत्रमुग्ध केले. दुसरा कार्यक्रम झाला तो म्हणजे आंतरराष्ट्र्रिय ओळख असलेले बासरीवादक श्री सुनिलजी अवचट यांच्या बासरीवादनाचा. पावसाळ्याच्या शेवटास झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थित श्रोत्यांचे मन जिंकले. यावर्षी २१ जानेवारीला यश सोमण, संतोष नाईक आणि चंद्रकांत चित्ते या तरुण हरहुन्नरी कलाकारांचा झाला. हुडहुडी भरवणा-या थंडीमध्ये रसिकांना जागा सोडु न देणारे सादरीकरण या तिघांनी केलं. तर अगदी नुकताच आणखी एक भलताच अनौपचारिक आणि ध्यानधारणा करण्यास प्रोत्साहन देणारा असा कार्यक्रम झाला.
तर मुद्दा असा आहे की आपण Instrumental प्रकारातील एका हाताच्या पाचही बोटांवर मोजता येतील इतके कार्यक्रम मागील एकाच वर्षाच्या कालावधीत केले व श्रोत्यांना हे सर्व कार्यक्रम खुपच आवडले. सर्वात शेवटचा कार्यक्रम झाला तो म्हणजे अभंगवाणी आणि गझल यांची संगीत रजनी. निसर्गप्रेमी आणि संगीतप्रेमींना ही संगीतरजनी खुपच आवडली.
आता पुढे काय?
The Program
झिम झिम झरती श्रावणधारा
श्रावण आणि पावसाची सुरेल मैफील
आषाढातील या पावसाचे एक वैशिष्ट्ये आहे. उन्हाळ्यामध्ये तप्त झालेल्या धरेला तृप्त करणारा, पावसाळ्याच्या सुरुवातीचा पाऊस पेरण्यांसाठी खुप गरजेचा असतो. एकदा पेरण्या झाल्या, भाताची रोपे वीतभार वाढली की मग भातलावणी सुरु होते. या भातलावणी साठी मात्र हलका पाऊस काही कामाचा नसतो. मुसळधार पाऊस पडला नाही तर भात-खाचरे पाण्याने तुडूंब भरणार नाहीत. शहराच्या पश्चिमेला असलेल्या मावळपट्ट्यात, आषाढामध्ये भातलावण्या पुर्ण होतात. श्रावण सुरु होण्यापुर्वीच भात लावण्या झालेल्या असतात.
आषाढातील जीवघेण्या पावसाने सर्वांनाच अक्षरशः नकोसे झालेले असते. मनुष्य जेव्हा शेतीच्या कामात व्यस्त असतो आषाढामध्ये तेव्हा, निसर्गातील इतर प्राणी, पक्षी देखील या जीवघेण्या पावसापासुन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कष्ट उपसत असतात. सर्वांनाच आतुरता असते श्रावणाच्या शुभागमनाची.
शेतकरी एव्हाना भातलावणी करुन, पेरण्या करुन मोकळा झालेला असतो. अत्यंत धामधुमीचा आषाढ शेतक-यांसाठी कष्ट करण्याचा असतो. आषाढ संपला की मग मात्र सुरु होतो आनंदोत्सव.
हा आनंदोत्सव नुसता शेतक-यांसाठीच नसतो, तर तो असतो अवघ्या सृष्टीसाठी. वादळ-वारे एव्हाना शांत झालेले असतात. मुसळधार, झोडपुन काढणारा पावसाची जागा रिमझिम श्रावण सरींनी घेतलेली असते. उन पावसाचा लंपडाव सुरु होतो. त्यातच सप्तरंगी इंद्रधनुष्य, कुठेना कुठे क्षितिजावर मनमोहक नजारा तयार करीत असतो.
इतके दिवस पावसाने कहर केलेला असल्याने निसर्गाकडे, निसर्गाच्या सौंदर्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. पण श्रावणात मात्र उसंत मिळालेल्या माणसाला निसर्गामध्ये झालेल्या अदभुत अशा बदलांचे दर्शन होते. श्रावणातील निसर्गाने भारतातील प्रत्येक भाषेतील साहित्यिकांना मोहीनी घातलेली आपणास दिसते. मराठी मध्ये तर श्रावण आणि कविता, सुमधुर गीते असे समीकरणच झालेले आहे.
आम्ही घेऊन जाणार आहोत तुम्हाला अदभुत अशा श्रावणगीत संगीत आणि कवितांच्या सफरीवर. विविध कवि, कवयित्रींनी रचलेल्या अजरामर अशा श्रावण-कविता, श्रावण-गीतांनी मराठी मनावर कायमची छाप उमटवलेली आपणास दिसते तीच श्रावणगाणी आपण ऐकणार आहोत हरहुन्नरी गायक, गायिकेच्या सुमधुर वाणीतुन.
This is going to be a residential program @ nisargshala. The performance is organised in the lap of mother nature, an area where there is absolute zero pollution of any sort be it sound pollution, light pollution or air pollution.
This is going to be a residential program @ nisargshala. The performance is organised in the lap of mother nature, an area where there is absolute zero pollution of any sort be it sound pollution, light pollution or air pollution.
कार्यक्रमाची रुपरेषा
दिनांक – १७ ऑगस्ट २०२४ मुक्कामी कार्यक्रम निसर्गशाळा येथे.
ठळक वैशिष्ट्ये –
निसर्गाची कुशीत, नदीच्या काठावर असणा-या निसर्गशाळेत हा कार्यक्रम सायंकाळी सुरु होईल.
श्रावणगीते, संगीत आणि कवितांचे सादरीकरण
मध्यांतर – हलका अल्पोपहार
पुन्हा सादरीकरण
रात्रीचे जेवण
नंतर उस्फुर्त संगीत मैफील ज्यात प्रेक्षक देखील भाग घेऊ शकतील
टेंट मध्ये मुक्काम
सकाळी नाश्ता झाल्यानंतर नदी, नाले , धबधबे, डोंगर दया यामध्ये स्वच्छंद भ्रमंती
अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम समाप्ती
ज्यांना Waterfall Rappelling & River crossing या धाडसी ऍक्टीव्हिटीज करायच्या आहेत त्यांनी आगाऊ नोंदणी करणे गरजेचे आहे.
शुल्क
वय वर्षे १० व पुढील सर्वांसाठी – १५०० रुपये
वय वर्षे ९ व त्या आतील ५ पर्यंत – १२०० रुपये
ऍडव्हेंचर ऍक्टिविटीजसाठी खालील प्रमाणे शुल्क आहे
Waterfall Rappelling – 1000 Rs per person per attempt
River crossing – 600 Rs per person per attempt
टिप – या कार्यक्रमात, इतर वीकएंड प्रमाणे BBQ नसते याची नोंद घ्यावी.
The Artist
Sayali Rajwade Joshi
Sayali Rajwade Joshi, a disciple of Vidushi Yashasvi Sirpoddar, began her training in Indian classical music from a young age under the guidance of Sau. Prajakta Kulkarni. Currently residing in Pune, she is furthering her education with Shri Govind Kulkarni and has also received vocal training from Vidhushi Mugdha Khare. Sayali has mastered various genres, including Natyageet, Abhang, Bhavgeet, and Ghazal singing, in both Hindi and Marathi languages. She has performed in hundreds of live music concerts across India.
Rudrapratap
Rudra started learning classical music at the age of 4 from his first guru Mrs Sangeeta Bhattacharjee and further went to various gurus in Nagpur. Further at the age of 16 he went to Ustaad Aqueel ahmed ji and learnt classical music for about 9 years. Now he is learning Classical music from a very renowned Classical Musician of India of Mewati Gharana “Pt.Sanjeev Abhyankar” ji.
साथ संगत
एकनाथ दिलीप जोशी
मूळगाव – वाशिम
शिक्षण -बी.ए. फर्ग्युसन पुणे.
एम.ए.संगीत सुरु.
ललित कला केंद्र,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे.
तबला विशारद.
गुरु
प्राथमिक शिक्षण – प्रा.डॉ.अनिल सोनूने गुरुजी वाशिम.
सध्या तबला गुरु
आदरणीय पंडित श्री. रामदासजी पळसुळे , पुणे .
गायन गुरु
आदरणीय पंडित श्री.हेमंतजी पेंडसे .
Malu Anil Gaonkar is a B.Com graduate and Sangeet Visharad in Harmonium, currently pursuing an M.A in Harmonium at Bharti Vidyapeeth, Pune. Trained by esteemed gurus including Shri Mahesh Gawas, Shri Ketan Chari, Shri Prasad Gawas, and currently Pt. Sudhir Nayak, Malu has won multiple first-place awards in harmonium solo competitions across Goa. Notable performances include solos at Yuva Samvadi Sammelan Pune and Antarnad Sangeet Sabha, Mapusa. He has accompanied renowned artists such as Pt. Raja Kale and Vidushi Shubhada Paradkar.

ध्वनी व्यवस्था - श्री राजु कांबळे
राजूभाई गेली २३ वर्षे अविरतपणे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ऊत्सव समिती साठी ध्वनी व्यवस्थापन पहात आहेत. त्याच बरोबरीने पं. हरीप्रसाद चौरासिया, ऊ. झाकीर हुसेन, आरतीताई अंकलीकर, शौनक अभिषेकी ह्यांसारख्या दिग्गज कलाकारांचा सहवास लाभलेले राजूभाई अनेक संगीत कार्यक्रमात कलाकार आणि साथीचा वाद्यवृंद ह्यांच्या स्वर-सुभाषितांचा सुरमिश्रित दरवळ अचुकपणे श्रोत्यांपर्यंत पोचवतात.
Nisargshala - Location
Registration Form
Please select संगीत रजनी @ निसर्गशाळा while selecting package
Registration Fee
Per Head - 1500 Rs per participant
Please use 9049002053 (upi id – hemantvavale-2@okhdfcbank) number to google pay fees. When you enter the number in google pay please select Hemant Vavale account. or Scan following QR code


Bank Account Details
Name – Nisargshala
Account Number – 50200033792832
IFSC – HDFC0002493
Branch Pirangut/Kasaramboli
