धाडस करणे, त्यासाठी स्वतःला शारिरीक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या तयार करणे, नवनवीन आव्हानांना सामोरं जाणे, ती आव्हाने यशस्वीरित्या पेलणे, अपयश आले तर ते पचवता यायला शिकणे आणि नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करणे हे सगळे करण्याचे वय कोणते आहे माहितीये का तुम्हाला?
हे सर्व करण्याचे वय आहे किशोर वय म्हणजे टीनेज. याच वयात आपण म्हणतो की मुलांना पंख फुटायला लागतात आणि ही नुसती म्हण नाहिये तर खरोखरीच त्यांना पंख फुटतात, नवीन काहीतरी करण्याची उर्मी असते, शरीन, मन आणि भावनिक अनेक बदल होत असतात आणि हे सर्व होत असताना त्यांना आवश्यकता असते नवनवीन क्षितिजांची, नवनवीन दिशांची , नवनवीन आव्हानांची. हे जर नाही मिळाल तर आपली मुल करीयर मध्ये यशस्वी होणार नाहीत असे अजिबात नाही पण ते जीवन जगण्याची, लढण्याची, संघर्षाची, नकाराची, अपयशाची, ध्येयपुर्तीच्या आनंदाची चव कदाचित कधीही चाखु शकणार नाहीत. एक संशोधन असे सांगते की जी मुले धाडस करतात, विविध आव्हानांना सामोरी जातात, जी आव्हाने लीलया पेलण्याचा प्रयत्न करतात ती मुले मोठेपणी इतरांच्या तुलनेने अधिक आनंदी जीवन यापन करतात.
आणि म्हणुनच आम्ही घेऊन येत आहोत एक भन्नाट कार्यक्रम ज्याचे नाव आहे
साहस – TOUGH GETS GOING
या कार्यक्रमात मुलां-मुलींना शारिरीक, मानसिक आणि भावनिक पातळीवर अधिकाधिक टफ म्हणजे विजिगीषु वृत्तीचे बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्व कार्यक्रम निरिक्षण आणि नोंदीच्या, शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या, अभ्यास आणि अनुभवाच्या आधारावर बनविले गेले आहेत.