Astronomy For Rural Students
खगोल विज्ञान परीक्षा आणि सादरीकरण स्पर्धा
नवा भारत आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहे. नुकतेच भारताने दोन महत्वकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेले. त्यातील एक म्हणजे चंद्रयान ३. चंद्रयान ३ च्या यशामुळे भारताचा लौकिक तर वाढलाच पण भारताला जगभरातुन खगोल विज्ञानात, अंतराळ संशोधनात अनेक नवीन संधी उपल्ब्ध झाल्या आहेत. याचाच अर्थ नव्या पिढीला रोजगाराच्या आणि लौकिकाच्या अनेक राष्ट्रिय आंतरराष्ट्रिय संधी निर्माण झाल्या आहेत.
पण दुर्दैव असे की या विज्ञानाच्या वाहत्या गंगेतील ज्ञानाचे दोन थेंब देखील ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.
आणि म्हणुनच आपल्या वेल्हे तालुक्यातील विद्यार्थ्यांना खगोलविज्ञान हा विषय समजावा, त्यात रुची निर्माण व्हावी या हेतुने निसर्गशाळा घेऊन येत आहे एक अभिनव उपक्रम.
यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी मधील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग घेऊ शकतील.

परिक्षा बहुपर्यायी प्रश्न, तसेच लेखी प्रश्नोत्तरे अशी असणार आहे. परिक्षेसाठी विषय खालील प्रमाणे आहेत.
- भारताची चंद्रयान मोहीम
- भारताची आदित्य एल १ मोहीम
- प्रकाशाचा वेग
- अंतरिक्षातील अंतरे
नावनोंदणी फॉर्म आणि शुल्क
नावनोंदणी शुल्क
प्रतिविद्यार्थी पाच रुपये फक्त
Please use 9049002053 (upi id – hemantvavale-2@okhdfcbank) number to google pay fees. When you enter the number in google pay please select Hemant Vavale account. or Scan following QR code
Bank Account Details
Name – Nisargshala
Account Number – 50200033792832
IFSC – HDFC0002493
Branch Pirangut/Kasaramboli
