निसर्गपर्यटन म्हणजे काय?

पर्यटन मग ते स्थानिक, देशांतर्गत असो वा परदेशातील, आज पर्यटनाला खुपच महत्व प्राप्त झाले आहे. विशेषतः कोरोना नंतरच्या काळात या क्षेत्रात आमुलाग्र बदल झालेले आणि नवनवीन उच्चांक गाठल्याचे स्पष्ट दिसते आहे. एकुणच काय तर सध्या पर्यटनाची चलती आहे. पुढे काय?
तर पुढची खुप मोठी झेप असेल निसर्ग पर्यटन …याला इंग्रजीमध्ये ECO-tourism असे संबोधतात. मराठीमध्ये आपण यास निसर्गपर्यटन म्हणु शकतो अथवा निसर्गपुरक पर्यटन देखील म्ह्णु शकतो.

पुढचा काळ अस म्हणता म्हणता ‘तो’ पुढचा काळ आलादेखील. आज समाज पर्यावरणाप्रती खुपच सजग होत आहे. त्यामुळे पर्यावरणास कसलीही हानी होऊ न देणा-या पर्यटन केंद्रांकडे, रीसॉर्ट्स कडे आजकाल पर्यटकांचा ओढा वाढलेला दिसतो आहे. अतिशय योग्य पध्दतीने , इको टुरिझम च्या मुळ तत्वांवर आधारीत विकसीत केलेल्या रीसॉर्ट्स, फार्म स्टे, होम स्टे इ मध्ये किमान एकेक महिना आधी बुकिंग करावे लागत आहे.

अतिशय सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे मात्र एक असाही व्यावसयिक वर्ग आहे की ज्याचे अजुन लक्षच गेलेलं नाही. पर्यावरण पुरक म्हणजे नेमके काय याची पुसटशी देखील कल्पना अनेकांना नाहीये. ही माहिती नसल्याने अनेक रीसॉर्ट मालक, व्यावसायिक खुप मोठ्या संधीपासुन दुर आहेत.

उच्च मानवी जीवनमुल्ये , स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धन यांची अत्युच्च दर्ज्याची सांगड म्हणजे निसर्गपर्यटन होय. यात जसा मनुष्य मग तो पर्यटक असो वा पर्यटन सेवा देणारा असो, त्या पर्यटन केंद्रात काम करणारा कर्मचारी असो वा एखादा स्थानिक मजुर , गवंडी असो, स्थानिक झाडं-झुडप असो , प्राणी जगत असो वा सुक्ष्मजीव जगत असो, निसर्गपर्यटनामध्ये सर्वांचेच हित साधले जाते. 

हा अभ्यासक्रम कोण करु शकते?

पर्यटन क्षेत्रात ज्यांना करीयर करावयाचे अआहे असे विद्यार्थी, सेवानिवृत्त व्यक्ति, ज्यांचे रीसॉर्ट आहे, फार्म हाऊस अथवा होम स्टे आहे असे लोक, ट्रेकिंग आणि धाडसी पर्यटन आयोजन करणारे तरुण

अभ्यासक्रमाचा हेतु काय आहे ?

नवीन रोजगार संधी निर्माण करणे, पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करणे, पर्यावरण पुरक पर्यटन केंद्रे उभारण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन करणे, निसर्ग, पर्यावरण, संस्कृती, लोकजीवन , जैवविविधता, वनस्पती विविधता आदींचे ज्ञान जतन करणे

शिक्षणाची पध्दत काय आहे ?

व्याख्याने आणि प्रत्यक्ष फिल्ड ट्रिप्स.

शिक्षण साहित्य काय वापरणार ?

प्रेझेंटेशन, दृकश्राव्य माध्यमं, प्रत्यक्ष अनुभव

प्रशिक्षणार्थींचे मुल्यपापन कसे करणार ?

लेखी परिक्षा आणि प्रोजेक्ट रीपोर्ट सादरीकरण

कालावधी – पाच दिवस

हा अभ्यासक्रम पाच दिवस, चार रात्री असा मुक्कामी अभ्यासक्रम आहे. 

कोर्स फी किती आहे ?

प्रवासखर्च, निवास, जेवण इ सहीत कोर्स फी = 10350 रु प्रत्येकी

कृपया खालील फॉर्म भरुन पाठवा

[supsystic-form id=21]

Registration Fee

June 2023 : 10350/- Rs per participant

Please use 9049002053 (upi id – hemantvavale-2@okhdfcbank) number to google pay fees. When you enter the number in google pay please select Hemant Vavale account. or Scan following QR code

Bank Account Details

Name – Nisargshala

Account Number – 50200033792832

IFSC – HDFC0002493

Branch Pirangut/Kasaramboli

Facebook Comments Box