आकाशातील चित्तरकथा – कृत्तिका

नेत्रतज्ञ हल्ली ज्या प्रमाणे प्राथमिक नेत्र चिकित्सा करतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळीदेखील नेत्र चिकित्सा केली जायची. फरक फक्त एवढाच होता की हल्ली डॉक्टर्स अक्षरे आणि चिन्हे ओळखायला लावतात, तर पुर्वी आकाशातील कृत्तिका नक्षत्र रुग्णास पाहावयास लावुन, प्राथमिक नेत्र चिकित्सा केली जायची. ज्या व्यक्तिला कृत्तिका तारकासमुहामध्ये सहा पेक्षा कमी तारे दिसत त्यास दृष्टीदोष आहे व ज्यास सात किंवा जास्त तारे दिसत, त्यास पुढे हेरगिरी, जासुसी सारख्या क्षेत्रात संधी मिळत असे. ज्यास सहा तारे दिसत, त्याची दृष्टी साधारण म्हणजे व्यवस्थित आहे असे मानले जायचे.

पाहिलय का कधी तुम्ही , हे कृत्तिका नक्षत्र, आकाशामध्ये? या दिवसात जर तुम्हाला कृत्तिका पाहायचे असेल तर, संध्याकाळी, म्हणजे काळोख होतानाच, हो अगदी होतानाच व पुढचा काही काळच, हे नक्षत्र, आकाशामध्ये पश्चिम गोलार्धात दिसते.

सर्व प्रथम आपण कृत्तिका चे चित्र पाहुयात आणि मग त्याची कथा.

कृत्तिका


The Pleiades, an open cluster consisting of approximately 3,000 stars at a distance of 400 light-years (120 parsecs) from Earth in the constellation of Taurus. It is also known as

The Pleiades, an open cluster consisting of approximately 3,000 stars at a distance of 400 light-years (120 parsecs) from Earth in the constellation of Taurus. It is also known as “The Seven Sisters”, or the astronomical designations NGC 1432/35 and M45.


Galileo's drawings of the Pleiades star cluster from Sidereus Nuncius. Image courtesy of the History of Science Collections, University of Oklahoma Libraries.

Galileo’s drawings of the Pleiades star cluster from Sidereus Nuncius. Image courtesy of the History of Science Collections, University of Oklahoma Libraries.


या नक्षत्रामध्ये ३०० च्या आसपास तारे, दुर्बिणीतुन पाहता येऊ शकतात. व उघड्या डोळ्यांना ६ ते ७ तारे , विनासायास दिसतात. अत्यंत लक्षणीय अशी ठेवण असलेल्या ह्या तारकासमुहातील मुख्य ६-७ ता-यांच्या भोवती विशिष्ट निळ्या रंगाची प्रभा दिसते. पुण्यातुन जर आपण कृत्तिका, ह्या दिवसांत पहायचा म्हंटले तर संधीकाळानंतर अगदी थोडाच वेळ कृत्तिका बघण्याची संधी मिळते. तेच आपण नोव्हेंबर डिसेंबर जर कृत्तिका पाहु जाल तर, जवळ जवळ ६ ते ७ तास आपण कृत्तिका आकाशामध्ये पाहु शकतो. कृत्तिका उगवताना, तिची जी रचना असते, त्याच्या अगदी उलटी मावळताना दिसते. असे सर्वच तारका समुहांच्या बाबतीत घडत असते. कृत्तिकेच्या आधी अश्विणी, भरणी पश्चिमेकडे मावळतीकडे असतात तर, रोहीणी, मृग मागोमाग, दक्षिण-पुर्व आकाशामध्ये दिसतात. वर हबल टेलीस्कोप मधुन टिपलेले कृत्तिकाचे छायाचित्र आहे.

The Pleiades constellation - stargazing near Pune


How to Find the Pleiades Star Cluster

How to Find the Pleiades Star Cluster

 


आता चित्रांची चित्तरकथा – 

भगवान भोले भंडारींच्या तेजाने, जन्माला आलेले मुल, सहा कन्यकांद्वारे वाढविले जाते. ह्या सहा कन्यका म्हणजेच कृत्तिका. व त्या मुलाच्या धातृ मातांच्या मुळेच भगवान शंकरांच्या त्या योध्द्या पुत्राला नाव पडले कार्तिकेय.

एक कथा पुरांणांकध्ये अशी आहे की, कृत्तिका म्हणजे सहा ऋषिपत्न्या आहे. सप्तर्षी नावाच्या नक्षत्रातील सहा ऋषिंच्या सहा पत्न्या म्हणजे कृत्तिका. संभूती, अनुसुया,क्षमा,प्रीती,सन्नती,अरुंधती आणि लज्जा अशी ह्या कृत्तिकांची नावे आहेत. ( तर सातवे ऋषि वसिष्ट हे त्यांच्या पत्नी सहीतच, सप्तर्षी तारका समुहामध्ये आहेत. वसिष्ट व त्यांची पत्नी अरुंधती, ही एक जुळी ता-यांची रचना आहे. हे दोन्ही तारे, एकमेकांभोवती, अत्यंत संथ गतीने, एकमेकांभोवती फिरत असतात. या विषयी विस्ताराने पुन्हा कधी तरी )

भारताप्रमाणे अन्य संस्कृतींमध्ये देखील, या तारकासमुहाला वेगवेगळ्या नावाने आणि कथांनी ओळखले जाते.

मुळ अमेरीकन संस्कृतीमध्ये देखील एक कथा येते. सात मैत्रिणी एकदा, चांदण्या रात्री, गम्मत, छंद म्हणुन दुरवर एका ठिकाणी नाचगाण्यासाठी जातात. तिथे गेल्यावर, नाच गाणे सुरु असताना, अचानक जंगली श्वापदे चहुबाजुंनी त्यांना घेरुन , ठार करणार, इतक्यात, त्या मुली, ज्या खडकावर उभ्या असतात, त्या खडकालाचा प्रार्थना करतात की त्या प्राण्यांपासुन वाचव म्हणुन. क्षणार्धात, तो खडक, असाच्या असा जमीनीपासुन, उंच उंच वाढु लागतो, व एक मोठा पर्वताचा सुळकाच त्या ठिकाणी उभा राहतो. पुढे जाऊन ह्या मुली तारका बनुन आकाशात जातात व तो सुळका आजदेखील उत्तर अमेरीकेमध्ये डेव्हिल्चा मनोरा किंवा पर्वत म्हणुन ओळखला जातो.

प्राचीन ग्रीक सभ्यता देखील ह्या तारका म्हणजे मुली आहेत असेच मानायची. ग्रीकांच्या कथेमध्ये, या मुलींच्या मागे कुणी जंगली प्राणी लागलेले नसतात, तर ओरायन नावाचा शिकारी लागलेला असतो. सात वर्षे पळुन पळुन थकल्यावर त्या मुली झीऊस नावाच्या ग्रीक देवतांच्या राजाची प्रार्थना करुन वाचवण्याची विनंती करतात. झीऊस दयाळु होऊन, त्या सात मुलींना आकाशामध्ये स्थिर आणि सुरक्षित करतो.

कृत्तिका या तारका समुहास, इंग्रजीमध्ये प्लेडीस असे म्हणतात. आधुनिक खगोलशात्र मानते की, कृत्तिका तारका समुह १० करोड इतक्या वर्षे वयाचा आहे. आणखी एक मतप्रवाह असा ही या पुंजातील काही तारे २५ लाख वर्षे इतक्या वयाचे आहेत.

वैदीक काळात कृत्तिका हे पहीले नक्षत्र मानले जायचे. याचा अर्थ असा होता, सुर्य जेव्हा कृत्तिका नक्षत्रात असायचा तेव्हा वसंत ऋतु सुरु व्हायचा, म्हणजेच दिवस व रात्र सारखे असायचे. शतपथ ब्राम्हण नावाच्या एका ग्रंथामध्ये, असा ही उल्लेख आहे की कृत्तिका पुर्वेपासुन ढळत नाही, तर बाकीची नक्षत्रे पुर्वेपासुन हलतात. हे जर खरे मानले तर, याचा अर्थ असा होईल की पुर्वी कधीतरी दिवस व रात्र एकसमान असण्याची, सुर्य कृत्तिकेमध्ये असतानाची असावी लागेल. वसंत विषुव म्हणजेच (मार्च) इक्विनॉक्स मार्च (चैत्र) मध्ये न येता कार्तिक मध्ये येत असावे.

सुर्य चंद्र पृथ्वी यांच्या गतिमानतेमुळे, विषुव व संपात बिंदु (मार्च व सप्टेंबर इक्विनॉक्स) पश्चिमेकडे सरकतात. एकुण २६००० वर्षांनी पुन्हा विषुव व संपात पुन्हा त्याच बिंदु वर येतात, हे आधुनिक खगोलशास्त्राने सिध्द केले आहे. याच विषुव बिंदुच्या सरकण्यामुळे कृत्तिका हल्ली पुर्वेला उगवत नाही. उलट गणिते करुन कृत्तिका पुर्वेला उगवायचे हे सिध्द केले गेले आहे. तो काळ होता इस पुर्व २५०० वर्षापुर्वीचा. त्यामुळे, भारतातील नक्षत्रांची यादी जगातील सर्वात जुनी आणि गणितीय सिध्दांतावर आधारीत अशी वैज्ञानिक यादी आहे.

याच तारका समुहा मधील  HD 23514 नावाच्या एका, सुर्यापेक्षाही मोठ्या ता-याभोवती, धुलीकण सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. शास्त्रंज्ञांच्या मते, धुलीकण सापडणे म्हणजे ता-याभोवती ग्रहांच्या निर्मितीची प्रक्रिया असु शकते.

पुढच्या वेळी अशाच एखादी आकाशातील चित्तरकथा जाणुन घेऊयात.

 

 

 

Facebook Comments

Share this if you like it..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares