Environment

तुम्ही कोणत्या प्रकारचे पर्यावरण प्रेमी आहात?

पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते.

Music, Tourism

चंद्रमाधवीच्या प्रदेशातील संगीत रजनी

मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का !

Astronomy, STar gazing

सरस्वती

आपल्या पुण्यातील आयुका व आयसर या दोन संस्थांनी देखील या डेटा वर संशोधन करायच ठरवलं. त्यांनी मीन राशीच्या दिशेच्या आकाशाच्या डेटावर अभ्यास करण्यास आणि त्याची निरीक्षणे करण्यास सुरुवात केली. यात रेडशिफ्ट हा महत्वाचा घटक होता.

Uncategorized

भोरगिरी – गुप्तभीमाशंकर – तीर्थ भीमाशंकर – गायदरा – सिद्धगड भटकंती

या वीरगळीचे एक वैशिष्ट्य आहे. एका गळीवर चक्क ठासनी ची बंदूक धारी वीर दिसतोय. वीर गळी साधारण अकराव्या शतकातील असाव्यात, इंग्रज येण्याच्या खुप पूर्वीच्या. बंदूक भारतात इंग्रजानी आणली नाही तर आपणास ती आधीच माहिती होती व वापरत होती. तुम्हाला फोटोमध्ये स्पष्ट दिसेल बंदूकधारी वीर.

Astronomy, Uncategorized

…आकाशदर्शन नक्की कशासाठी?

एकदा सपकाळ सरांसोबत मी अजीवलीच्या देवराई परीसरात होतो. रात्री एका कौलारु घराच्या, शेणाने सारवलेल्या अंगणात पथा-या टाकुन आम्ही पाठ टेकवुन आकाशाकडे पाहात होतो. सरांनी आकाशाकडे बोट करुन स्वाती दाखवली, चित्रा दाखवली आणि मग म्हणाले ती बघ तिकडे, दुर, क्षितिजाच्या अगदी जवळ ‘सारीका’…मी शोधण्याचा खुप प्रयत्न केला पण मला काही सारिका दिसली नाही तिथे…..

Music, Nature, Tourism

निसर्गात बासरीवादन – श्री सुनिल अवचट

मध्यंतरानंतर सुनिलजींनी बासरीविषयी अधिक माहिती देत अनेक प्रकारच्या बासरी कश्या असतात ते दाखवले , वाजवुन देखील ऐकवले आणि त्या त्या बासरीचा कोणत्या काळी कधी कसा वापर लोकसंगीत असो वा सिनेमा संगीत असो त्यात झाला ते प्रत्यक्ष वाजवुन दाखवले.

Fitness, Mountaineering, Rock Climbing

माझे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण

कसेबसे स्नो-क्राफ्ट पुर्ण झाले, आईस क्राफ्ट झाले, असे पंधरा दिवस बर्फात आम्ही राहिलो. सर्वात शेवटचा कार्यक्रम तो म्हणजे हिमशिखरांवर चढाई करीत जास्तीत जास्त उंची गाठायची. याला हाईट गेन असे म्हणतात. हाईट गेन म्हणजे एक प्रकारे शिकलेल्या सर्व कौशल्यांची परिक्षाच होय. सकाळचे सर्व कार्यक्रम उरकुन आम्ही पाठीवरच्या सॅक भरु लागलो. सर्व जण तयार झाले. मी झालो माझी सॅक घेऊन. आणि इतक्यात एक गडबड झाली. माझ्या पोटात खळगा पडला आणि …

Astronomy, Nature

आकाशातील चित्तरकथा मृगनक्षत्राची – भाग १

Asterism च्याच सोबतीला पिढ्यानपिढ्या वरील सारख्या कथा देखील भारतात सांगितल्या जातात ज्यामुळे केवळ आकाशाचा एक छोटासा भागच नाही तर बराच मोठा भाग ओळखणे एकाच कथेने सहज सोपे होऊन जाते. एकदा कथा समजली तर तारकासमुह समजणे खुप सोपे कारण तारका समुह कथेतील पात्रांप्रमाणे गुणवैशिष्ट्ये असणारेच असतात.

Write a review

Scroll to Top