निसर्गशाळेच्या हुप्प्या कॅम्पचे प्रशिक्षक म्हणजे काय?
निसर्गशाळा म्हणजे निसर्गाची शाळा. ही रुढ अर्थाने शाळा नाहीये पण शाळा म्हंटल्यावर जे समोर येत ते म्हणजे शिक्षण प्रशिक्षण अस सर्व निसर्गशाळेत होत असत. इथ लहान मुलं-मुली तर शिकतातच पण मोठ्यांना देखील खुप काही शिकायला मिळतं. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जे जे म्हणुन आवश्यक शिक्षण आहे ते आपण निसर्गशाळेत देण्याचा प्रयत्न करीत असतो.
यातीलच एक भाग म्हणजे हुप्प्या कॅम्प होय. हा कॅम्प वय वर्षे सात व पुढील मुला-मुलींसाठी योजनाबध्द केला आहे. यात मुलांना खुप काही शिकायला मिळत सोबतच कसल्याही साधनांशिवाय निखळ आनंदाचा अनुभव मुला०मुलींना मिळतो. गेली अनेक वर्षे आपण हे कॅम्प घेत आहोत. मुल-मुलींना तसेच पालकांना देखील हा कॅम्प खुपच आवडायला लागला आहे.
अनेक वर्षे अनुभवातुन, निरिक्षण आणि नोंदींतुन तयार झालेला हा कॅम्प मुलांना निखळ आनंद देणारा तर आहेच सोबतच हा कॅम्प त्यांच्या नकळत अनेक त्यांना एनक जीवनमुल्ये शिकवुन जातो. त्यांच्या मनातील अंधाराची भीती नाहीशी होते, ऊंचीची भीती नाहीशी होण्यासाठी मदत होते, सहजीवन काय असते ते मुलांना शिकता येते, सहजीवनात एकमेकांना मदत करणे, टीम वर्क करणे इत्यादी मुलं आपोआप शिकतात. नेतृत्व गुणाचा विकास होण्यासाठी मदत होते. संभाषण कौशल्य सुधारते, मत मांडता येण मुल शिकतात.
या सोबतच अनेक धाडसी कार्यक्रम खेळ असतात. मन-बुध्दीचा कस लागेल असे कार्यक्रम असतात. झाडा-झुडपांची ओळख होते, इकोसिस्टम म्हणजे काय हे मुल प्रत्यक्ष पाहतात. दगड-धोंंड्यांशी मुलं मैत्री करतात. नदी-नाल्यांमध्ये खेळतात, डोंगर चढतात, जंगलात फिरतात. इतिहास समजुन घेण्याचा प्रयत्न करतात तर संस्कृतीची ओळख देखील यातुन होत असते.
हुप्प्या कॅम्पचा प्रशिक्षक म्हणजे वरील सर्व उपक्रम करताना मुला-मुलींचा एक जाणता सोबती होय. हा सोबती मुला-मुलींना मदत करीत नाही तर त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांना समजुन घेतो, त्यांच्यातील कमी-अधिक जाणुन त्यांना ध्येय गाठण्यासाठी प्रेरीत करतो.
या कॅम्पसाठी मुलांना पाठविणे पालकांना सोपे जावे म्हणुन याची फी देखील आपण मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. निव्वळ कॉस्ट म्हणजे होणारे खर्च आपण फी म्हणुन घेतो जेणेकरुन मुला-मुलींना अधिकाधिक चांगला अनुभव देता यावा. स्वयंसेवक म्हणुन येणा-यांकडून कसल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. हे कॅम्प जसे आपण शहरातील मुलांसाठी करतो तसेच कॅम्प ग्रामीण भागातील मुलांसाठी विनाशुल्क करीत असतो.
तुम्हाला जर असे प्रशिक्षक व्हायचे असेल तर खालील फॉर्म भरुन पाठवा म्हणजे तुमच्याशी संपर्क साधुन अधिक बोलता येईल.
धन्यवाद
श्री हेमंत ववले
निसर्गशाळा
9049002053
नियम व अटी
- तुम्ही निसर्गशाळेच्या हुप्प्या कॅम्प मध्ये स्वयंसेवक / प्रशिक्षक म्हणुन आलात तर तुम्ही पुढील किमान एक वर्ष अन्य कोणत्याही इतर कंपन्या, संस्थांच्या कॅम्प मध्ये प्रशिक्षक / स्वयंसेवक म्हणुन भाग घेऊ नये
- तुम्ही जे काही फोटो व्हिडीयो काढाल ते परवानगी शिवाय कोणत्याही पब्लिक डोमेन मध्ये प्रकाशित , पोस्ट करु नये
- कॅम्प चा अभ्यासक्रम अती मेहनत, परिश्रमाने बनविला आहे, त्यामुळे तो अभ्यासक्रम, activities ची माहिती बाहेरील कुणालाही तुम्ही देणार नाही
- कॅम्प सुरु होण्याआधी तुम्हाला सर्व माहिती, सुचना दिली जाईल, त्याप्रमाणे तुम्ही काम करणे अपेक्षित आहे. तुमच्याकडे काही कल्पक कार्यक्रम असेल तर आधी कॅम्प संयोजकांशी बोलावे मगच असे कार्यक्रम योग्य वाटले तर आपण मुलांसाठी घेऊ.
- पालक अथवा मुलांना कॅम्प संपल्यावर तुम्ही फोन करणे अपेक्षित नाही जर चुकुन तुमच्याकडे मोबाईल नंबर आले असतील पालकांचे काही कारणास्तव.
