मला आठवतय जेव्हा मी नवीनच ट्रेकींगला सुरुवात केली होती तेव्हा आमच्या कडे कॅमेरा नसायचा. ग्रुपमधील एखाद्याकडे जरी कॅमेरा असला तरी ती खुप मोठी पर्वणी असायची. मग अगदी मोजुन मापुन फोटो काढणे होत असायचे. कारण त्याकाळातील कॅमे-यांमध्ये फोटो काढण्याला मर्यादा होत्या. बॅटरी लाईफ कमी असायचे आणि रोलचे क्षमत फक्त ३६ किंवा ४० फोटोंचीच असायची. आणि कॅमेरे देखील म्हणावे इतके अद्ययावत नसायचे. तरीदेखील त्यावेळी आणि आताही फोटो काढणे व काढलेले फोटो स्वःतच वारंवार पाहणे, हे आपल्या सर्वांनाच आवडते. बरोबर ना?

आपल्या इथे आकाशदर्शन साठी आलेले कुटूंब, मागे तारांगण दिसत आहे. हा फोटो मोबाईल मधुन काढला आहे.. तुमच्या मोबाईल स्क्रीन चा ब्राइटनेस वाढवुन पहा हा फोटो.

हल्ली परिस्थीती बदलली आहे. हल्ली अगदी सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत. व प्रत्येक स्मार्टफोनची कमीत कमी १० मेगापिक्सेलचा तरी असतोच. हे कमीत कमी म्ह्णतोय बर का! अगदी हौशी लोकांकडे, तरुण मुला-मुलींकडे अगदी २०,३० मेगा पिक्सेल कॅमेरा क्षमता असलेले स्मार्ट देखील आहेत. हे अगदी सर्वसामान्य चित्र आहे सध्या!

आणि त्यातही गम्मत म्हणजे किती फोटो काढावेत याला मर्यादा नाहीये. कितीही क्लिक करा, नाही आवडला तर आणखी क्लिक करा.

मी जेव्हा सोशल मीडीयावर, मी मोबाईल कॅमे-यातुन काढलेले फोटोज शेयर करतो तेव्हा अनेकांना ते खुप आवडतात. कित्येकांनी मला वैयक्तिक मेसेज करुन ‘इतके छान फोटो मोबाईल मधुन कसे काढता?’ असे विचारले देखील. कित्येकांना असे ही वाटते की मी काढलेले फोटो कदाचित एखाद्या उच्च क्षमता व तंत्रज्ञान असलेल्या डी एस एल आर कॅमे-यामधुन टिपले असावेत.

स्मार्टफोन कॅमे-याचा हेतु खरतर आकाशातील ता-यांचे फोटो काढण्याचा नाहीये. त्यातुन साधारण लॅंडस्केप, पोर्ट्रेट असे फोटो काढणे एवढेच अपेक्षित असते. पण अगदी थोडीच माहिती जर आपण आपापल्या मोबाईल कॅमे-याची समजुन घेतली तर आपण मोबाईल कॅमे-याचा उपयोग अधिक चांगली व्यावसायिक दर्ज्याची फोटोग्राफी करण्यासाठी करु शकतो.

आज मी तुम्हाला सांगणार आहे स्मार्टफोन द्वारे कमी प्रकाशात म्हणजे रात्रीच्या वेळी आकाशातील नक्षत्रांचे, तारांगणाचे फोटो कसे काढायचे!

असे फोटो काढण्यासाठी तुमच्या जो कोणता स्मार्टफोन आहे तोच तुम्ही वापरु शकता. यासाठी वेगळे कसलेही साधन घ्यायची गरज नाहीये.

चला तर मग समजुन घेऊयात कसे काढावे आकाशातील तारकांदळांचे फोटो आपल्या मोबाईल मधुन.

सर्वप्रथम आपणास हे समजुन घेतले पाहिजे की आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये एकापेक्षा जास्त ‘मोड’/ Mode असतात फोटो काढण्यासाठी. त्यातील आपण जो सर्रास वापरतो तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. यात आपणास फक्त ॲन्गल व कॅमे-याच्या लेन्स वर पडणा-या प्रकाशाच्या बाबतीत लक्ष ठेवायचे असते. कोणत्याही फोटोग्राफीचा पहिला नियम आहे प्रखर प्रकाश कॅमे-याच्या लेन्स वर येणार अशा ॲन्गल ने मोबाईल हातात धरावा. जर प्रकाश सरळ लेन्स वर पडत असेल तर तुमच्या फोटोतील ऑब्जेक्ट (म्हणजे ज्या वस्तु अथवा व्यक्तिचे छायाचित्र काढायचे आहे ते) फोटोमध्ये दिसणार नाही. जर त्याच ॲन्गल ने फोटो काढणे निकडीचे असेल तेव्हा आपल्या एका हाताने लेन्स वरील प्रकाश अडवावा व मग क्लिक करावे. हे अगदी सोपे आहे करुन पहा.

तर या ॲटोमॅटीक मोड मध्ये वरील दोनच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बाकी सगळ्या गोष्टी मोबाईल मधील सॉफ्टवेयर आपल्यासाठी आपोआप करते.

खालील स्क्रीनशॉट पहा. यात ‘Take Photo’  असे जे लिहिले आहे तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. सर्वच मोबाईल कॅमे-यांना हा मोड असतोच. याच्या बाजुला ‘FACE BEAUTY’ असे लिहिले आहे हा देखील ॲटोमॅटीक मोडच आहे.

याच्या आणखी थोडे डावीकडे स्क्रोल केले तर आपणास ‘PANORAMA’ हा मोड दिसेल. व त्याच्याही आणखी डावीकडे ‘PROFESSIONAL’  हा मोड दिसेल.

यामध्ये सर्वात डावीकडे तुम्हाला EV म्हणजे एक्स्पोजर व्हॅल्यु दिसेल, त्यानंतर ISO, S, WB, AF आणि शेवटी एकमेकांचा पाठलाग करणारे दोन वर्तुळाकार बाण दिसतील. यातील शेवटचा आयकॉन म्हणजे ते बाण, कॅमेरा बदलण्यासाठी वापरला जातो म्हणजे मागील कॅमे-या ऐवजी पुढील म्हणजे सेल्फी कॅमेरा वापरायचा असेल तर किंवा पुढील ऐवजी मागील म्हणजे मुख्य कॅमेरा वापरायचा असेल तर हा आयकॉन ला स्पर्श करायचा.

प्रत्यक्ष आकाशातील ता-यांचा फोटो कसा काढावा हे पाहण्यापुर्वी काही बेसिक माहिती आपण आधी घेऊयात. मॅन्युअल मोड म्हणजे प्रोफेशनल मोड मधील सर्व सेटींग्ज (प्रोफेशनल मोड मधील वर सांगितलेले सर्व आयकॉन्स) विषयी थोडक्यात व अगदी सोप्या भाषेत ही माहिती पाहुयात.

EV – Exposure Value  – Focal length  व Shutter speed यांचे प्रमाणबध्द गुणोत्तर म्हणजे EV.

ISO – Also known as Camera ISO. हे सेटींग कॅमे-याचे इमेज सेन्सर ठरवते

S – Shutter speed. म्हणजे एक्स्पोजर टाईम याचा अर्थ एखादा फोटो काढण्यासाठी लेन्स चे शटर  किती वेळ उघडे ठेवायचे याचे मानक. (आपल्या डोळ्यांना जशा पापण्या असतात तशाच कॅमे-याला देखील असतात. कॅमे-याच्या लेन्सच्या पापण्या उघडल्या तरच त्याला दिसत व जे दिसले आहे त्याचा फोटो निघतो)

WB – White-Balance याचा उपयोग अधिकाधिक रंगसंगतीचा वापर निघणा-या फोटो मध्ये करण्यासाठी केला जातो. आकाशातील ता-यांचे फोटो काढताना, सुरुवातीस याचा फारसा उपयोग होत नाही. पण तुम्हाला बाकीचे सेटींग्जच उपयोग योग्य पध्दतीने जमला की मग तुम्ही याचा देखील उपयोग करु शकता.

AF – Auto Focus याचा उपयोग फोटो मधील कोणत्या ऑब्जेक्ट वर फोकस करायच आहे हे ठरवण्यासाठी होतो. छोट्या फुलांचे, किंवा छोट्या ऑब्जेक्ट्स चे फोटो काढताना याचा खुप उपयोग होतो. बाय डिफॉल्ट हे Auto म्हणजे आपोआप वर सेट असते. पण तुम्ही ते बदलुन Manual mode मध्ये वापरु शकता.

आता आपण प्रत्यक्ष पाहुयात फोटो कसे काढायचे

रात्रीच्या आकाशाचे, नक्षत्र, ता-यांचे, आकाशगंगेचे फोटो मोबाईल मध्ये काढण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे करावे लागेल

  • प्रकाश प्रदुषणापासुन थोडे दुर जावे. शहरी भागात खुपच जास्त प्रकाश प्रदुषण आहे. त्यामुळे शक्य असल्यास शहरापासुन थोडे दुर जावे.
  • आकाशात चांदण्या उघड्या डोळ्यांना दिसत असल्यास तुम्ही त्या पैकी एखादे नक्षत्र ठरवा की ज्याचा फोटो काढायचा आहे. (एकदा तुम्ही निष्णात झाला की उघड्या डोळ्यांना दिसत नसताना देखील तुम्ही आकाशातील ता-यांचे फोटो काढु शकता)
  • या प्रकारचे फोटो काढताना मोबाईल हलता कामा नसतो. यासाठी तुम्ही ट्रायपॉड वापरु शकता. माझ्या ट्रायपॉड नसल्याने मी सरळ फोन जमिनीवर किंवा खुर्ची किंवा जिथे योग्य व सुरक्षित समतल जागा मिळेल तिथे फोन ठेवतो.
  • आता आपण सेटींग पाहुयात.
    1. EV बदलण्याची आवश्यकता नाहीये
    2. ISO – यावरुन आपला येणारा फोटो प्रकाशाला किती संवेदनशील असेल हे ठरते . एकदमच काळोख्या रात्री मी सर्वात जास्त असलेल्या व्हॅल्यु वर सेट करतो. तुम्ही यात प्रयोग करुन पाहु शकता
    3. आता शटर स्पीड सेट करायचे. शटर म्हणजे कॅमे-याची झापड, ती जितका जास्त वेळ उघडी असतील तितका जास्त वेळ कॅमेरा प्रकाश एकत्रित करत राहील. प्रकाश एकत्रित करणे म्हणजेच फोटो काढणे.
    4. WB- याचा आपणास शिकताना काहीही उपयोग नाही. तुम्ही वरील तीन सेटींग्ज चा वेगवेगळ्या व्हॅल्युंना कसा व काय उपयोग होतो हे करुन पाहीले व शिकलात की मग WB चे प्रयोग करुन पाहु शकता
    5. AF – यात आपण शिकताना काहीही बदल करण्याची गरज नाहीये. तुम्ही पहिल्या तीन सेटींग्ज चा वेगवेगळ्या व्हॅल्युंना कसा व काय उपयोग होतो हे करुन पाहीले व शिकलात की मग WB चे प्रयोग करुन पाहु शकता
  • हे सर्व करण्यासाठी व शिकण्यासाठी तुम्हाला फार फार तर एक दोन दिवसच लागतील. व एकाच वेळी तुम्ही तासभर देऊ शकलात तर एका तासातच तुम्ही हे शिकु शकता.

लेखामध्ये मी अत्यंत बेसिक सेटींग्ज सांगितल्या आहेत. एकदा तुम्हाला या जमल्या की तुम्ही स्वतःहुन पुढील गोष्टी शिकाल. या द्वारे आपण अगदी आकाशगंगेचे फोटो देखील काढु शकतो पण त्यासाठी सातत्य व प्रयोगशीलता हवी. काही नवीन साधने, लेन्सेस चा उपयोग तुम्ही मोबाईल फोटोग्राफीसाठी पुढे जाऊन करु शकता. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. सुरुवातीस फोटो नीट नाही निघाले तरी प्रयत्न सोडु नका. आत्ताच्या काळात रोल चे कॅमेरे नाहीत. स्मार्टफोन आहेत. चांगला नाही वाटला एखादा फोटो की डीलीट करुन दुसरा काढा. 

वरील प्रमाणे आकाशातील तारांगणाचे फोटो काढुन अवश्य या लेखाच्या खाली कमेंट (फेसबुक) मध्ये तुम्ही नक्षत्रांचे काढलेले फोटो पोस्ट करा. आकाशातील नक्षत्रांना कसे ओळखायचे हे शिकायचे असेल तर याच वेबसाईट वरील आकाशातील चित्तरकथा नावाची लेख मालिका सवडीने वाचा.

हा फोटो देखील निसर्गशाळा येथुनच काढला आहे मोबाईल मधुन.
ध्येया वाडकर ने मोबाईल मधुन काढलेला आपल्या आकाशगंगेचा फोटो
आपल्या आकाशगंगेचा मी निसर्गशाळा येथुन मोबाईल मध्ये टिपलेला फोटो

कळावे

आपला

हेमंत सिताराम ववले

निसर्गशाळा पुणे

मोबाईल वर ता-यांचे फोटो कसे काढावे

निसर्गशाळेचे आगामी कार्यक्रम

Facebook Comments

Share this if you like it..

Categories:

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हुप्प्या – The Symphony of Emotions
A Team outing with a difference @ Nisargshala
Blog posts & Event Alerts

Recent Articles
  • In Astronomy, STar gazing
    निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ पाहु शकतो, अनेक दुरस्थ तारे, तारकापुंज पाहु शकतो, चंद्र तर इतका सुंदर आणि स्पष्ट दिसतो की त्यावरील खड्डे नसुन महाकाय विवरं आहेत, दया आहेत, त्यांना खोल असे कडे आहेत. एकदा आपल्याकडे एक खगोल निरीक्षक त्यांची १६ इंच व्यासाची दुर्बीण घेऊन आले होते , त्यातुन त्यांनी मला चंद्रावरील अश्याच एका विवराचा कडा दाखवला. हा कडा पाहताना मला हरिश्चंद्र गडावरील कोकणकडा आठवला. लौकरच आपण म्हणजे निसर्गशाळा बारा इंच व्यास असलेली अजुन प्रगत अशी दुर्बीण घेणार आहोत. […]
  • In Environment
    महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली. […]
  • In Environment
    म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. […]
  • In Environment
    पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते. […]
  • In Music, Tourism
    मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का ! […]