Nature Amusing Nisargshala

निसर्गाची रंगपंचमी

निसर्गातील सप्तरंगांची उधळण..

निसर्गरम्य निसर्गशाळा

पर्यटन म्हणजे विरंगुळा, पर्यटन म्हणजे निवांतपणा, पर्यटन म्हणजे स्वःतशी जवळीक, पर्यटन म्हणजे स्वःतचा शोध, पर्यटन म्हणजे ह्या चराचराचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. पर्यटनातुन आपल्या जीवनास एक नवी दिशा आणि दशा प्राप्त होऊ शकते. आवश्यकता असते फक्त डोळसपणे पर्यटन करण्याची. अनेकदा अनेक पर्यटक निसर्गशाळेच्या विविध सहलींना येत असतात. इथे आल्यावर सर्वात प्रथम समजते की आपण झोपलेले नसताना, म्हणजेच जागे असताना देखील मोबाईल फोन शिवाय राहु शकतो. नुसतेच राहु शकत नाही तर, आपण आपल्या स्वतला आणि आपल्या कुटुंबियांस, मित्र परीवारास अधिक चांगल्या प्रकारे वेळ देऊ शकतो.

निसर्गशाळेच्या निसर्गाला कसल्याही सीमा नाहीयेत. कॅम्पसाईट च्या जवळुन वाहणारी नदी, त्याच्या पलीकडील डोंगर, धबधबा, कड्या कपारी, एवढेच काय तर गर्द निळे आकाश देखील आपल्या निसर्ग निरीक्षणाचे, अनुभवाचे, आनंदाचे साधन होऊ शकते.

इथे विरंगुळ्यासाठी टिव्ही नाही. सिनेमा नाही. इथे आहे एक मोठ्ठा अर्धगोलाकार, काळाकभिन्न, अनंत अंतहिन आकाशाचा पडदा, आणि त्यावर थेट कार्यक्रम सुरु असतात, तेही निरंतर, ह्या आकाशातील असंख्य ग्रह नक्षत्र ता-यांचे. आमच्या कडे येताना आम्ही पालकांना नेहमी सांगतो, की आमच्या वेबसाईट वरुन आकाशदर्शनाचा नकाशा डाऊनलोड करुन आणा, शक्य असल्यास त्याचा आधी स्वतः अभ्यास करा व तुमच्या मुलांसमवेत, अंधारात, ह्या रात्रीच्या आकाशाची सफर तुमची तुम्हीच करा. मुलांना जेव्हा त्यांचे आई-बाबा ही सगळी माहीती सांगतात त्यावेळी मुल मोठ्या आवडीने ऐकतात व आत्मसात करतात.

रात्रीच्या आकाशातच नव्हे तर दिवसा उजेडी देखील, तुम्ही वयाने लहान असो मोठे असो, कुणीही असो, इथे नक्कीच रमुन जाता. दिवसा, डोळे उघडे आणि तोंड बंद ठेवुन आपण जर हा परीसर फिरलो, तर आपणास निसर्गाच्या अनेक विध छटा पाहावयास, अनुभवावयास मिळतील. पृथ्वीवरील आपले अनेक सहचर, कशा पध्दतीने निसर्गात नांदताहेत हे ही पाहावयास मिळेल. पश्चिम घाट हा जगातील अतिप्रचीन पर्वतांपैकी एक समजला जातो. ह्या घाटमाथ्यावर प्राणी आणि पक्षांचे अक्षरक्षः नंदनवन आहे.

 

इथे आलेले सर्वजण निसर्गात रमुन जातात. म्हणुन एका पर्यटकांने तर निसर्गशाळेचे नाव बदलुन “निसर्गरम्य निसर्गशाळा” ठेवा असा सल्ला ही दिला.

Summer Camping Gallery