आर्यभटाची चांद्रमोहीम – चांद्रयान-२

Share this if you like it..

पाचव्या आणि सहाव्या शतकात एक लोकोत्तर आचार्य भारताने पाहीला. त्याने महारथी ने कोणत्याही दुरबिनीशिवाय अनेक असंभव असे सिध्दांत मांडले. पृथ्वी आणि इतर ग्रह सुर्याच्या भोवती फिरतात हे आर्थभटाने सांगितले.

आर्यभट

पुणे येथील आर्यभटाची मुर्ती

पाचव्या शतकामध्ये ह्या माणसाने पृथ्वीचा स्वतभोवती भ्रमणकाल, २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.१ सेकंद इतका सांगितला, तर आधुनिक विज्ञान हा कालावधी २३:५६:४.०९१ इतका सांगते. आर्यभटाच्या संशोधनानुसार पृथ्वीचा व्यास ३९,९६८.०५८२  एवढा आहे, तर आधुनिक विज्ञान सांगते की पृथ्वीचा व्यास ४०,०७५.०१६७ इतका आहे. हा जो फरक दिसतो तो ०.२% आहे. चंद्र स्वयंप्रकाशित नसुन तो सुर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय याविषयी सविस्तर संशोधन करणारा आर्यभट म्हणजे भारताचा विज्ञानाचार्यच होता.

आता २१ व्या शतकातील त्या आर्यभटाचे वंशज काय दिवे लावताहेत बघा जरा.

भारतातील शास्त्रज्ञानी  फक्त २५ किलो वजनाची, एका सुटकेस च्या आकाराची एक रीमोट ची गाडी तयार केली आहे. ही गाडी चालणार आहे चंद्राच्या दक्षिण गोलार्धाच्या टोकावरील पृष्टभागावर. आणि तिचा रिमोट असणार आहे, भारतीय शास्त्रज्ञांच्या हातामध्ये.

चंद्राच्या पृष्टभागाविषयी माहीती

चंद्राच्या पृष्टभागाविषयी माहीती

आहे ना गंमत. बर ही गाडी काय नुसती गंमत म्हणुन चालणार नाही तर, ती एक अख्खा चंद्रदिवस चंद्राच्या पृष्टभागावर फिरणार आहे. एक चंद्रदिवस म्हणजे पृथ्वीचे १४ दिवस. ह्याअ १४ दिवसात ही गाडी, चंद्रावरील प्लास्मा मोजण्यासाठी लैंगमुईर तपासणी यंत्र घेऊन जाणार आहे. चंद्रावरील मातीला शास्त्रज्ञांनी रीगॉलीथ हे नाव दिले आहे. तर ही माती आपल्या मातीसारखी नसुन ती चंद्रच्या पर्यावरणामध्ये तरंगत असते. व भविष्यात ह्या तरंगणा-या चंद्रमृत्तिकेवर शेती केली जाऊ शकते की नाही याचा शोध घेण्यामध्ये भारताची ही गाडी खुप मोलाची भुमिका बजावणार आहे.

आपली ही गाडी स्वतः सोबत भुकंपमापक यंत्र देखील घेऊन फिरणार आहे. त्या १४ दिवसाच्या काळात जर चंद्रावर एखादा हलका जरी भुकंप झाला तरी, ही रिमोटची गाडी त्या भुकंपाची तीव्रता मोजेल आणि त्यामुळे, चंद्राचा आतील भाग म्हणजे गाभा कशाचा बनला आहे, ह्याविषयी आणखी जास्त अधिकृत माहीती जगभरातील शास्त्रंज्ञांस मिळेल. सोबतच चांद्रयान-१ च्या वेळी भारताने, त्या मोहीमेतुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे, चंद्रावर पाण्याचे अंश असल्याचा दावा केला होता. अनेकांनी तो हसण्यावारी नेला. यावेळी चंद्रावर पाणी असणे शक्य नाही, तसेच पाणी आहे किंवा नाही याविषयी वाद झाले. चांद्रयान-२ च्या यशानंतर, चंद्रावर किती पाणी आहे, असे वाद होतील.

लॅंडर आणि रोव्हर

लॅंडर आणि रोव्हर

त्यासोबतच ही गाडी एक स्पेक्ट्रोमीटर देखील सोबत घेऊन जाणार आहे, त्याद्वारे, चंद्रवरील कडक पृष्टभागाचा व त्यावरील खनिजांचा अभ्यास केला जाईल.

भारताच्या या चांद्रयान-2 मोहीमेची कथा देखील अशीच रोचक आहे. सन २००९ मध्ये, चांद्रयान १ सोबत भारतीय शास्त्रज्ञांचा संपर्क संपला. त्यानंतर, लगेच भारताने चांद्रयान-२ ची घोषणा केली. चांद्रयान-२, खरतर २०१५ मध्ये चंद्राकडे घेप घेणार होते. रशियाच्या अवकाश संशोधक संस्थेने चांद्रयान-२ साठी लागणारे लॅंडर आणि रोव्हर असे तंत्रज्ञान देण्यासाठी करार केला. २०१२ मध्ये रशियाकडुन हे तंत्रज्ञान भारतास मिळणार होते. 

चांद्रयान-२ मधील रोव्हर

हिच ती रिमोटची गाडी

 

रशियाला अनेक प्रयत्न करुन देखील वेळ पाळता आली नाही आणि शेवटी भारताने , स्वतःच्या हिंमतीवरच चांद्रयान-२ पुढे नेण्याचे ठरवले. त्यानुसार संपुर्ण भारतीय बनावटीचे लॅंडर आणि रोव्हर (रोव्हर म्हणजे तीच रिमोट ची गाडी बर का!) बनवण्याच्या कामाला सन २०१४ नंतर वेग आला. रशियाकडुन झालेल्या उशिरामुळे, २०१५ चे उद्दीष्ट आपण, एप्रिल २०१८ मध्ये गाठणार आहोत.

आणखी एक रंजक माहीती चांद्रयान-२ विषयी. तुम्ही हॉलीवुड मध्ये बनलेला एक जगप्रसिध्द सिनेमा “इंटरस्टेलर” पाहीला असेलच. नसेल पाहीला तर अवश्य बघा. तर या सिनेमाच्या बजेट पेक्षा ही कमी बजेट मध्ये भारताचे चांद्रयान-२ चंद्रावर स्वारी करणार आहे.

भारताचे मंगलयान मोहीमेने प्रगत समजल्या जाणा-या अनेक बड्या राष्ट्रांच्या भुवया उंचावल्या गेल्या. चंद्रावर राष्ट्रध्वज फडकवणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश भारत आहे. आणि चांद्रयान-२ मुळे तर चंद्र मोहीमा व चंद्राचा अभ्यास ह्या क्षेत्रामध्ये खुप मोठी उलथा पालथ होणार आहे. चंद्रावर पाण्याच्या शोधाचे श्रेय भारताच्या पदरात पडेल. तसेच अनेक सुक्ष्म निरीक्षणे देखील चांद्रयान-२ करील . यामध्ये चंद्राच्या भोवती वेढे मारणारे ऑर्बीटर, चंद्राच्या पृष्टभागाचे हाय डेफीनीशन फोटो देखील काढेल. २००९ मध्येच चांद्रयान-१ ने, चंद्राचा ९५% नकाशा काढुन ठेवलाय. ह्या मोहीमेच्या वेळी, हे काम १००% पुर्ण होणार.

किती अफाट काम आहे हे. ह्या ब्रम्हांडास सीमा नाहीत. त्याप्रमाणेच विज्ञान देखील असीमीत आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण भारतीय मंडळी आर्यभटाचेच कार्य आणखी पुढे नेणार आहोत. या उपलब्धीच्या निमित्ताने आपण आपली पाठ थोपटुन घ्यायला काहीच हरकत नाहीये.

आतुरतेने वाट पहा मग, चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची.

Facebook Comments

Share this if you like it..

One thought on “आर्यभटाची चांद्रमोहीम – चांद्रयान-२

  1. Ashok Waghmare

    मस्त. विज्ञान इतक्या मजेदार पध्दतीने पहिल्यांदाच वाचले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *